About Us

माळी समाजाचे संघटन व्हावे, विचारांचे आदान प्रदान व्हावे, एकमेकांचा परिचय व्हावा या दृष्टीने मासिक माळी आवाज या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी मानून केवळ समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी संस्था कार्यरत आहे. मासिक माळी आवाज हे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जाणारे माळी समाजाचे मुखपत्र आहे. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला मासिक माळी आवाज प्रकाशित होते.

समतेचा विचार प्रथम मांडणारे समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले, भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, बहुजन समाजातील पहिले संपादक दीनबंधूकार कृष्णाजी पांडूरंग भालेकर, सहकार महर्षी ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, पहिले ग्रामीण पत्रकार दीनमित्रकार मुकुंदराव पाटील या सत्यशोधक चळवळीत योगदान देणार्या , व्यक्ती व त्यांच्या कार्याचा प्रचार, प्रसार तसेच त्यावर आधारित लेख मासिकामधून प्रसिद्ध केले जातात. माळी समाजातील मासिकामधून नवोदित साहित्यिकांच्या साहित्यिस प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाते. समाजामध्ये घडणार्‍या घटनांची माहिती माळी वृत्त या सदरामधून दिली जाते. समाज बांधवांचा आप-आपसात परिचय व्हावा म्हणून प्रतिवर्षी माळी समाजबांधवांची समाजबांधव परिचय डायरीही आम्ही वेळोवेळी प्रकाशित केलेली आहे.

सभासदांसाठी वधू - वर विषयक मार्गदर्शन ( यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमची विभागीय कार्यालये आहेत ) वधू - वर मेळाव्यांचे आयोजन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या करीत आलेलो आहोत. विवाहपूर्व व विवाहानंतर संस्थेमार्फत आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ समुदेशकांकडून समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाते. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून अनेक विवाह जमले आहेत व ही सर्व दांपत्ये सुखात, आनंदात आपला संसार करीत आहेत.

मासिक माळी आवाजच्या माध्यमातून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करीत असतो. समाजामध्ये पितृछत्र हरपलेल्या व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. समाजातील स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मासिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. विधायक कार्य करणार्या् समाजबांधवांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला जातो. माळी समाजातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या व पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण कार्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. विधवा महिलांसह सर्वांनाच एकत्रित करुन हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ केला जातो.

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही आज माळी आवाजचे अनेक सभासद आहेत. माळी आवाजच्या या समाजिक उपक्रमांमध्ये आपला सहभागही महत्वाचा आहे. आपण त्यात सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी होण्यास सांगावे आणि हा आवाज सर्वदूर पोहचवावा ही विनंती.

नियम व अटी

१) आपली मुदत नोंदणी केल्यापासून १ वर्षासाठी असेल.

२) आपण इंटरनेटवर नोंदणी फी रु.२८००/- आहे. यामध्ये मासिक माळी आवाजच्या वार्षिक वर्गणीचाही समावेश आहे.ही वर्गणी आपण आमच्या, आपल्या जवळच्या कोणत्याही प्रतिनिधीकडे जमा करावी अथवा कार्यालयाकडे पाठवावी त्याशिवाय आपल्याला इंटरनेटचा अॅक्सेस दिला जाणार नाही.

३) आपण इंटरनेटवर फॉर्म भरल्यानंतर जे लॉगिन नेम व पासवर्ड टाकलेले असते ते जपून ठेवावे. विसरु नये. वारंवार आपल्याला आपले लॉगिन नेम व पासवर्ड सांगीतले जाणार नाही.

४) इंटरनेटवरुन आपल्याला स्थळांची माहिती मिळेल, पण कोणत्याही स्थळाचा मोबाईल नंबर, फोन नंबर तसेच पत्ता मिळणार नाही. तो कार्यालयाकडून घ्यावा लागेल. इंटरनेटवरुन अथवा कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर त्या स्थळाची संपूर्ण चौकशी आपण स्वतः करावयाची आहे. संस्था यामध्ये फक्त सूचकाची भूमिका घेते.

५) इंटरनेटवर आपल्याला आपला फोटो टाकता आला नाही तर तो आम्हाला मेल करावा. आमच्याकडून तो फोटो आपल्या बायोडाटावर लोड केला जाईल.त्यासाठीचा मेल आय डी पुढीलप्रमाणे आहे.
maliawaj17@gmail.com

६) आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले नांव व आवश्यक माहिती मासिक माळी आवाज मधून एका वर्षात चार वेळेस प्रकाशित केली जाईल. त्यात रंगीत फोटोसह माहितीचा समावेश एका अंकात असेल व तीन वेळेस सूचीमध्ये आपले नाव प्रकाशित करण्यात येईल.

७) कोणत्याही माहितीचा उपयोग आपण आपला विवाहाच्या दृष्टीनेच करावा. सदर माहिती दुसर्‍यास देणे, त्या माहितीचा दुरुपयोग करणे असे काही आढळून आल्यास आपल्याला दिलेले इंटरनेट अॅक्सेस बंद केला जाईल व आपली नोंद रद्द केली जाईल. तसेच आमच्या साईट वरुण आपण कोणाचाही फोटो डाऊन लोड करुन घेऊ नये तसे आढळल्यास त्याक्षणी आपली नोंद रद्य केली जाईल याची नोंद घ्यावी.

८) आपला विवाह आमच्या मार्फत अथवा आपल्या स्वप्रयत्नाने झाल्यास आपण आम्हास ताबडतोब कळवावे म्हणजे आपली आमच्याकडची नोंद रद्द करून आपल्याला स्थळे पाठविणे बंद केले जाईल. संस्थेमार्फत विवाह जमल्यास पत्रिके मध्ये सौजन्य - माळी आवाज (मासिक) वधू वर सूचक केंद्र असे आवर्जून नमूद करावे.




स्व .विजयकुमार लडकत यांनी स्थापन केलेल्या मासिक माळी आवाजच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले.

दीप प्रज्वलन करताना मा आमदार कमलताई ढोले-पाटील म. फुले मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर राऊत म .फुले मंडळाचे वसतिगृह अध्यक्ष श्री दीपक जगताप

सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्षा शारदाताई लडकत माळी महासंघ महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिताताई लडकत व मासिक माळी आवाज परिवार .



 +91-9158333758, +91-8767581906            maliawaj17@gmail.com
 +91-9158333758, +91-8767581906          
 maliawaj17@gmail.com
© Masik Mali Awaj, All Rights Reserved. Developed by Softkey Solutions
eXTReMe Tracker